



जनतेच्या हक्कांचे प्रश्न वेळेवर मार्गी लावून मतदारसंघातील तरुणाईच्या भविष्यासाठी भक्कम पायाभरणी करण्याचा संकल्प केला आहे. पलूस-कडेगावच्या जनतेसाठी अहोरात्र काम करणाऱ्यांसाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ डॉ. विश्वजित कदम यांनी केले. ते कडेगाव तहसील कार्यालयात तहसील कार्यालयात सनद, कुणबी दाखल्यांचे वाटप कुणबी दाखले, सनद तसेच शैक्षणिक दाखले वाटप प्रसंगी बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार अजित शेलार उपस्थित होते. यावेळी आ. डॉ. विश्वजित कदम यांच्याहस्ते १०० कुणबी दाखले, वाजेगाव येथील ३३ व्यक्तींना सनद वाटप तर, शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक दाखल्यांचे वाटप करण्यात आले.