उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

अठरा वर्षे पूर्ण होताच ‘अपाक शेरा’ हटवणार

कडेगावच्या तहसीलदारांकडून जिवंत ७/१२ मोहीम टप्पा-२ ला वेग

“जमिनीवरील हक्कांची पारदर्शकता ही शेतकऱ्यांच्या भवितव्याची हमी आहे. १८ वर्षे वय पूर्ण असलेल्या व्यक्तीचा अपाक (अज्ञान पालक कर्ता) शेरा ठेवू नये” अशा शब्दांत कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांनी महसूल कर्मचाऱ्यांना निर्देश दिले आहेत. महसूल विभागाच्या जिवंत ७/१२ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात जमिनीवरील अनावश्यक पालनकर्त्यांची नावे वगळून ७/१२ उतारे अद्ययावत करण्याची गतिमान मोहीम हाती घेतली आहे. खातेदाराच्या वयाचा पुरावा तपासून ई-हक्कप्रणालीतून अपाक शेरा कमी केला जाणार आहे. जन्म-मृत्यू रजिस्टरच्या नोंदींवर आधारित तपासणी करून अद्ययावत प्रक्रिया पूर्ण होईल. शेतकऱ्यांनी वयाचा पुरावा तहसील कार्यालयात सादर करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखरेख

जिवंत ७/१२ मोहिमेवर जिल्हाधिकारी अशोक काकडे व कडेगाव उपविभागीय अधिकारी रणजित भोसले यांचे लक्ष आहे. ही मोहीम वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश तहसीलदार अजित शेलार यांनी दिले आहेत.

शेतकऱ्यांच्या हक्कांमध्ये पारदर्शकता ही आमची प्राथमिकता आहे. वेळेत अपाक शेरा हटवणे हेच वाद टाळण्याचे प्रमुख पाऊल आहे. १८ वर्षे पूर्ण असलेल्या व ७/१२ वर अपाक शेरा असलेल्या व्यक्तींनी वयाचा पुरावा घेऊन तलाठ्यांशी संपर्क साधावा व अपाक शेरा हटवून नोंद लावावी.

– अजित शेलार, तहसीलदार कडेगाव

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading