उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

कडेगाव तहसिलदारांनी उताऱ्यावरील तगाई कर्ज बोजा उतरवला

एक हजार उताऱ्यावर आता महिला ‘कारभारीन’

पुर्वीच्या काळी बरेच शेतकरी सावकार व इतर खाजगी व्यक्तींकडून हात उसनवारीने कर्ज रक्कम उचल करीत असे. सदर रक्कमेस तारण म्हणून बिना ताब्याने शेतजमिन गहाण ठेवून त्याबाबत नजर गहाण घेणार (न.ग.घे.) अशा नोंदी केले गेल्या यात शासनाच्या योजनीची प्रभावी अंमलबजावणी करत कडेगांव तहसीलदार अजित शेलार यांनी ६८६ गटातील तगाई कर्ज बोजा उतरवला तर एक हजार उताऱ्यावर लक्ष्मीमुक्ती योजनेतुन महिलांची नावे नोंदवली आहेत.

कडेगांव तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या ७/१२ च्या इतर हक्कात गेली ४० वर्ष पासुन नजर गहाण नोंद होती. उसनवार रकमेची परतफ ड केल्यानंतर नजर गहाण ठेवलेल्या शेतजमिनीच्या इतर हक्कातील नजर गहाणचा बोजा कमी होणे आवश्यक होते. परंतु सदरचे बोजे आजही काही ७/१२ वर कायम राहिले होते ते कमी करणेसाठी तहसीलदार अजित शेलार यानी आवाहन केल्यानंतर तलाठी यांच्या मार्फत ६८६ शेतक-यांकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जासोबत उपलब्ध जुने ७/१२ व फ रफार घेऊन बोजे कमी करण्यात आले आहेत.

१९७१ साली शासनाने शेती सुधारणेसाठी विशेष म ोहिम हाती घेतली होती. त्यात शेतीला बांध घालणे, जमीन सपाटीकरण करून पावसाचे पाणी शेतातच जिरवणे व शेती अधिक उत्पादनक्षम बनविणे हा प्रामुख्यान उद्देश होता. त्या अनुषंगाने शासनाने महाराष्ट्रात सर्व जिल्हयात कृषि खात्याचे मृदसंधारण विभागाने (बंडीग खाते) प्रत्येक गटाच्या सिमांकनानुसार बांध घालण्याची कार्यवाही केली होती. त्यासंबंधीचा येणारा खर्च शेतक-यांकडून घेण्यात येत होता.

शासनाकडून शेती , जमीन सुधारणासाठी विहीर, तगाई, बैलतगाई, चारातगाई, खावटी तगाई, ऑईल इंजिन तगाई, घरबांधणे तगाई, जळीत तगाई, बि-बियाणे तगाई देण्यात आल्या होत्या. सदर विविध तगाईची परतफ `ड करण्यासाठी शासनाने शेतक-यांना हफ्ते ठरवून दिलेले होते. त्याची नोंद ७/१२ च्या इतर हक्कात वेळोवेळी घेण्यात आली होती. त्यापैकी काही शेतक-यांनी कर्जाची फेड करून निर्बो जचा दाखला प्राप्त करुन इतर हक्कातील बोजे कमी करून घेतले होते तसेच शासनाने देखील वेळोवेळी तगाई कर्ज माफ केली होती परंतु काही शेतकऱ्यांच्या उतारावर बोजे कायम होते ते ही आता कमी झाले आहेत तालुक्यात लक्ष्मीमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात महसूल प्रशासनास यश आले आहे.

५८५ महिलांच्या नावे एक हजार एक गट करण्यात आला आहेत. १८५ गटातील एकत्र कुटुंब मॅनेजर नावे कमी करुन वारस शोधुन त्यांची नावे नोंदवली गेली आहेत. ३६२ अज्ञान पालक नोंदी कमी करुन आता सज्ञान शेतकरी उताऱ्यावर आले आहेत. तालुक्यातील ४०५ मयत खातेदार यांच्या १ हजार ८२९ गटात वारसांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे या सर्व बाबींसाठी शेतकऱ्यांना एक रुपया खर्च नाही व कार्यालयात हेलपाटेही मारावे लागले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाचे आभार मानले आहेत.

शासनाच्या विविध योजना कडेगांव तालुक्यात प्रभावीपने राबवल्या जात आहेत, याचा नागरीकांनी लाभ घ्यावा. महसुल प्रशासनाच्या वतीने तालुक्यात विविध शिबीरे घेण्यात आली आहेत याचा लाभ अनेकांना झाला आहे. शेतकर्यांनी ए.कु. म्या अ.पा.क कमी करण्यासाठी तलाठी यांच्याकडे अर्ज करावा.

– अजित शेलार, तहसीलदार कडेगांव

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading