उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

कडेगावात महसूलकडून घरपोच दाखले

सेवा कर्मी कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कडेगाव: १५० दिवसांचा सेवा कर्मी कार्यक्रम अंतर्गत कडेगाव शहरातील मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय येथे विद्यार्थी यांना दाखले वाटप आणि नव मतदार नोंदणी बाबत शिबीरात विद्यार्थीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रम अधिकारी नायब तहसीलदार सागर कुलकर्णी यांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना नायब तहसीलदार सागर कुलकर्णी म्हणाले की जिल्हाधिकारी अशोक काकडे, प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार अजित शेलार, प्राचार्य डॉ. डी जी कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापकांनी मागील दोन महिन्या पासून केलेल्या नियोजनमुळे एका दिवसात १५३ विद्यार्थीनी मतदार नोंदणी अर्ज सादर केले तर २३५ विविध प्रकारचे दाखले साठी अर्ज प्राप्त झाले. सदर अर्जाची तपासणी करून लवकरच सदर विद्यार्थी यांना कॉलेज मध्येच दाखले व एपिक कार्ड चे वितरण करण्यात येणार आहे.

ज्या विद्यार्थी यांना आज कागदपत्रे अभावी दाखले व मतदार नोंदणी अर्ज भरता आलेले नाहीत त्यांना सेवा हमी पंधरवढा अंतर्गत कॉलेज च्या नियमित वेळेत अर्ज संबंधित नोडल अधिकारी यांचेकडे देता येतील. कोणताही शालेय विद्यार्थी विविध योजना पासुन वंचित राहनार नाही. विभाग प्रमुख प्रा. नंदकुमार मोहिते, प्रा. कांबळे सेतू व्यवस्थापक विराज पवार, निवडणूक विभाग श्री विघ्नेश देसाई, पल्लवी वायदंडे, विद्या माळी यांच्या सह विध्यार्थि मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक प्रा. वाहिदा शेख आणि विध्यार्थिनी कु. कृष्णा तकरी यांनी मानले.

संधीचा लाभ घ्यावा…
तालुक्यातील प्रत्येक महाविद्यालयात विविध दाखले वाटप आणि नव मतदार नोंदणी बाबत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे दाखल्यासाठी आता सेतु कार्यालयात यायची गरज नाही आता मेळाव्याचे दाखले संबंधितांना तोच होतील. या संधीचा लाभ विध्यार्थिनी घ्यावा तसेच १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान तालुक्यात शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरकुल आणि पर्यावरण संरक्षणाचे उपक्रम राबविले जात आहेत या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा.
-अजित शेलार, तहसीलदार कडेगांव

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading