तहसीलदार अजित शेलार : शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
राज्य शासनाच्या आदेशानुसार कडेगाव तालुक्याच्या प्रत्येक मंडल कार्यालयामध्ये एकाच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभिमान शिविर राबवले जात आहे. या शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या सर्वच विभागांतील नागरिकांच्या कामाचा निपटारा जागेवर होत असल्यामुळे हे अभियान दुहेरी फायदेशीर ठरत आहे, असे मत तहसीलदार अजित शेलार यांनी व्यक्त केले.
नेवरी मंडल, ग्रामपंचायत व महसूल अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज राजस्वअभिमान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी रणजित भोसले, सरपंच प्रमिला साळुंखे उपसरपंच हर्षद ननवरे, कडेगाव पुरवठा अधिकारी सुनील झाल्टे, सदस्य दत्तात्रय महाडिक, अॅड. प्रतीकेत जाधव, विनीत माने उपस्थित होते.
तहसीलदार अजित शेलार म्हणाले, कडेगाव तालुक्यातील नेवरी, कडेपूर, वांगी, शेळगाव या मंडल
ग्राम महसूल कार्यक्षेत्रामध्ये शिबिराचे आयोजन केले आहे. यावेळी मंडलअधिकारी कविता चव्हाण, अधिकारी परमेश्वर मुंडे, ग्रामविकास अधिकारी संदीप कुंभार, मुख्याध्यापक संतोष मोहिते, राजाराम महाडिक उपस्थित होते.
चार शिबिरात १,७६२ दाखल्यांची नोंद
तालुक्यातील चार शिबिरांमध्ये एकूण १,७६२ दाखल्यांची नोंद यामध्ये जातीचे दारवले, उत्पन्न दारवले, डोमेसाईल दाखले, रहिवासी, अल्पभूधारक रेशनिंग कार्ड, लक्ष्मी मुक्ती योजना, एकोमानोंदी ग्रीस्टॅक यासह अन्य दाखल्यांचे वाटप करण्यात आले. नेवरी २७१ दाखले वाटप, ८५ पुढील कार्यवाही एकूण ३५६, वांगी ३२७ दारवले वाटप, १०७ पुढील कार्यवाही ४३४ एकूण, कडेगाव ५४०दाखले वाटप, २८ पुढील कार्यवाही ५६८ एकूण, शाळगाव ३४२ दाखले वाटप, ६२ पुढील कार्यवाही, ४०४ एकूण दाखल्यांची नोंद व वितरण करण्यात आले.
