उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांचा नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या हस्ते सत्कार – कार्यकुशलतेची दखल; जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाने सन्मानित

कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांनी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये कार्यालयीन कामकाजात उत्कृष्ट कामगिरी बजावली असून, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली यांच्यातर्फे आयोजित कार्य मूल्यमापनात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते तहसिलदार अजित शेलार यांना अधिकृत प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने त्यांच्या कार्यकुशलतेची, वेळेवर निर्णयक्षमतेची आणि जनहितदृष्ट्या सकारात्मक दृष्टिकोनाची प्रशंसा केली आहे. तहसीलदार शेलार यांनी आपल्या पदाचा कार्यभार अत्यंत जबाबदारीने, नियोजनबद्ध पद्धतीने आणि नागरिकाभिमुखतेने पार पाडला आहे. त्यांच्या कार्याची ही दखल म्हणजे इतर अधिकाऱ्यांसाठी प्रेरणा आहे, असे गौरवोद्वार यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी काढले. तहसीलदार अजित शेलार यांच्या या यशामुळे कडेगाव तालुक्याचे नाव संपूर्ण जिल्ह्यात उज्ज्वल झाले असून, स्थानिक पातळीवरही त्यांच्या कार्यकुशलतेची चर्चा होत आहे. आज तहसीलदार कार्यालयात तहसीलदार अजित शेलार यांचा कडेगांव चे नगराध्यक्ष धनंजय देशमुख भैय्या यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उप नगराध्यक्ष अमोल डांगे, माजी उपनगराध्यक्ष विजय गायकवाड, पत्रकार हिराजी देशमुख, नगरसेवक निलेश लंगडे, मुक्तार पटेल, संजय गायकवाड बुवा, माजी सरपंच संभाजी यादव, रविंद्र सुर्यवंशी व मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading