रामापुर ता. कडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ता अधिक शिंदे यांच्या हाकेला कडेगावचे कर्तव्यदक्ष तहसीलदार अजित शेलार धावल्याचे चित्र पाहयला मिळाले.
रामापूर वांगी तहसीलदार अजित शेलार रोडवरील ओढ्याजवळ रस्त्यावरती खड्डे पडल्यामुळे वारंवार अपघात होत होते या बाबी सामाजिक कार्यकर्ता अधिक शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर याबाबतची परिस्थिती अधिक शिंदे यांनी कडेगावचे कर्तव्यदक्ष तहसीलदार अजित शेलार यांच्या निदर्शनास आणून दिली. शेलार साहेब यांनी या सामाजिक कार्यकर्ताच्या हाकेला तत्परतेने धावून सार्वजनिक बांध काम विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश पोळ यांना तातडीने हे खड्डे मुजवण्याच्या सुचना दिल्या तहसीलदार अजित शेलार यांच्या या सुचनेनुसार तत्परतेने सार्वजनिक बांध काम विभागाने सदरच्या रस्त्यामधील खड्डे मुजवून तत्पर सेवा देण्याचे काम केले.
रामापूरचे अधिक शिंदे हे सातत्याने रामापुर परिसरातील सार्वजनिक सामाजिक प्रश्नावरती सातत्याने लढा व आवाज उठवित असतात त्यांच्या या हाकेला प्रशासनाचे प्रतिसाद भुमिका घेण्याचे काम तहसीलदार अजित शेलार यांनी केले आहे. तहसीलदार अजित शेलार हे कडेगाव तालुक्यात लोकांच्या अडिअडचणी व सामान्य लोकांच्या प्रश्नावरती तात्काळ कार्यवाही करण्याचे काम करित असतात त्यामुळे या दोघांनी सर्व सामान्य लोकांच्या अडिअडचणीचा निपटारा लावण्यासाठी एकत्रित पध्दतीने काम करून सामान्य लोकांच्या प्रश्नाला न्याय देण्याचे काम केले आहे या कार्यतत्परतेचे या परिसरातून कौतुक होत आहे

