उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

‘एकुम’ ऐवजी वारसांची नावे सातबारावर

कडेगाव तालुक्यात अजित शेलार यांची मोहीम : ७/१२ उतारा होणार पारदर्शक

: कुटुंबातील वारसांमध्ये वाढणारे वाद व कायदेशीर गोंधळ रोखण्यासाठी महसूल विभागाच्या ‘जिवंत ७/१२ मोहीम टप्पा-२’ अंतर्गत एकुमें नोंदी हटवून फेरफार प्रमाणे सर्व कायदेशीर वारसांची नावे ७/१२ उताऱ्यावर कब्जेदार सदरी स्पष्ट नोंदविण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि प्रांताधिकारी रणजित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांनी मंडल अधिकारी व तलाठी यांना निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी चे निर्देश दिले आहेत. या मोहिमेचा फायदा नागरिकांना होणार असून फेरफार प्रमाणे नोंद असलेल्या सदस्याचा कायदेशीर मालकी हक्क निर्विवादपणे स्पष्ट होईल

कुटुंबातील वादांना आता पूर्णविराम

गेल्या काही दशकांमध्ये ‘एकुमें’ (एकत्र कुटुंब व्यवस्थापक) नोंदींमुळे कायदेशीर वारसांच्या हक्कांबाबत गोंधळ निर्माण होऊन अनेक न्यायालयीन खटल्यांमध्ये वाढ झाली होती. या गंभीर प्रश्नावर तोडगा म्हणून शासन निर्णयानुसार आता एकुमें नोंदी हटवून फेरफार प्रमाणे सर्व वारसांची भोगवटादार म्हणून स्पष्ट नोंद करण्यात येणार आहे. यामुळे कुटुंबात होणाऱ्या अनेक वादांना आता पूर्णविराम मिळाला आहे

एकुमें नोंदी हटवून फेरफार पाहून नोंदीचे निर्देश तलाठ्यांना दिले सर्व वारसांची भोगवटादार म्हणून आहेत. एकुमें नोंद लागलेल्या २२८ कुटुंबांनी याचा लाभ घेऊन वारस नोंदी केल्या आहेत. एकुमें नोंद असलेल्या उर्वरित कुटुंबांनी मूळ फेरफार काढून आपली नावे अचूक व निर्विवादपणे नोंदवून घ्यावीत.

– अजित शेलार, तहसीलदार, कडेगाव.

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading