उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

कडेगाव तालुक्यात महाराजस्व अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद १६७७ नागरिकांना थेट शासकीय सेवा

कडेगाव तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत महसूल विभागाने लोकाभिमुख प्रशासनाचे उत्तम उदाहरण सादर केले आहे.

महसूल सप्ताहानिमित्त ४ व ६ ऑगस्ट २०२५ रोजी तालुक्यातील पाचही महसूल मंडळांत आयोजित करण्यात आलेल्या या अभियानात तब्बल १६७७ नागरिकांनी थेट शासकीय सेवा घेतल्या, ही उल्लेखनीय बाब ठरली आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार राबवण्यात आलेल्या या अभियानात दाखले वाटप, जिवंत सातबारा, राशन कार्ड सेवा, संजय गांधी योजना, निवडणूक

ओळखपत्र, कृषी व ग्रामविकास विभागाच्या योजनांचा लाभ, तसेच ऍग्रिस्टँक नोंदणी अशा महत्वाच्या सेवा एका छताखाली देण्यात आल्या. ग्रामपात्तळीवर लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत प्रशासनाच्या या प्रयत्नांना भरभरून दाद दिली. कडेगाव मंडलमधील शिवाजीनगर येथे ५६८ नागरिकांनी विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला. वांगी मंडळ मधील रामापूर येथे ३२७ नागरिकांनी तसेच शाळगाव मंडळ मधील सोहो-ली येथे ४२८ तर नेवरी ३५६ नागरिकांनी विविध दाखले व प्रलंबित कामे करून घेतली व या अभियानाचा लाभ घेतला.चिंचणी मंडल मधील देवराष्ट्रे येथे लवकर मेळावा संपन्न होणार आहे. तालुक्यात एकंदरीत १६७७लाभार्थी नागरिकांनी अभियानात सेवा घेतली. हे अभियान जिल्हाधिकारी अशोक काकडे,

उपविभागीय अधिकारी रणजित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तर कडेगावचे तहसिलदार अजित शेलार यांच्या नेतृत्वाखाली अंमलात आणण्यात आले. तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी समर्पित भावनेने योगदान दिले.

नागरिकांचा प्रतिसाद प्रेरणादायी तहसीलदार अजित शेलार

या अभियानाच्या हा माध्यमातून शासनाच्या विविध योजना थेट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाला. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. वर्षांतून चार वेळा मंडळनिहाय अशा मेळाव्यांचे आयोजन करून अधिकाधिक नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. अभियान लोकशाहीतील खऱ्या अर्थाने ‘जनतेसाठी सरकार’ हे अधोरेखित करणारे ठरले आहे. असे कडेगावचे तहसिलदार अजित शेलार यांनी सांगितले.

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading