तडसर येथील युवकांनी भटक्या विमुक्त समाजाच्या सोडवल्या समस्या आणि या समाजाला न्याय दिला. जात प्रमाणपत्र बाबत असणान्या या अडचणीचा सामना करणाऱ्या या बाबी राजेंद्र जाधव संदिप पवार निलेश चव्हाण या तरुणांनी सोडवून मोठ्या प्रमाणात समाजाला न्याय देण्याची भूमिका या तरुणांनी घेऊन समाज सुधारणेचा मार्ग धरला.
भटकी विमुक्त जात नंदीवाले समाजांना पूर्वी ना गाव होतं ना घर होतं, आज इथं तर उद्या तिथं, दलितांपेक्षा भक्ष्यांचं जीवन प्रचंड दुःखाने, कष्टानं, दरिद्रयानं, मागासलेपणानं ग्रासलेलं होतं. उधाहनिर्बसाठी नंदीबैलाचा खेळ करत होते. दुष्काळी परिस्थितीमुळं
नंदीबैलाच पालन-पोषण करणं अवघड होऊ लागल होते. कालांतरानं नंदीबैल संभाळणं जड जाऊ लागले. हळूहळू नंदीबैलाचा खेळ संपुष्टात आला. कालांतरानं हा समाज हळूहळू एका जागी स्थायिक होऊ लागला. हा समाज गावातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोलमजुरी करू लागला. मिळेल ते काम करू लागला, काबाडकष्ट
करण्याची सवय व निष्ठता यामुळे चांगले पैसे मिळू लागले. कालांतराने काहींनी स्वताःचे व्यवसाय चालू केले. उदा. भांडी विकणं, भंगार गोळा करणं, लग्नात बाजंत्री म्हणून जाणं, गवंडी काम करणं, असे छोटे विविध व्यवसाय करू लागले. एका जागी स्थायिक झाल्यामुळे मुलांना शिक्षणाची गोडी लागली. काही
दिवसांनी मुलांच्या शिक्षणासाठी जातीचे दाखले ही मोठी समस्या निर्माण झाली. शिक्षणासाठी जातीचे दाखले कसे काढायचे, हा एक मोठा प्रश्न या समाजातील लोकांपुढे निर्माण झाला. समाजातील मुलांना जातीचा दाखला सहजासहजी मिळत नसल्याने तडसर येथील नंदीबाले समाजातील काही युवकांनी हे सर्व समस्या लक्षात घेऊन ही अडचण कशी दूर करता येईल. यासाठी तडसर मधील नंदीवाले समाजांचे युवा कार्यकर्ते राजेंद्र शिवाजी जाधव यांनी संदीप लक्ष्मण पवार व निलेश लालासाहेब चव्हाण यांना सोबत घेऊन समाजातील लोकांचे जातीचे दाखल्यासाठी लागणारे कागदपत्रे समाजातील लोकांच्याकडून गोळा केले. यासाठी लागणारी, पुत्ता करून तड सर मधील जयंत
शिवाजीराव पाटील यांचे मार्गदर्शन घेऊन सर्व कागदपत्रे कडे गाव तहसिल कार्यालय येथे १ ऑगस्ट २०२४ रोजी ११० कागदपत्रे पुराद -सहित जमा केले. यामागेही जुलै २०२० मध्ये राजेंद्र शिवाजी जाधव व संदीप लक्ष्मण पवार यांच्या प्रयत्नांनी समाजातील एकूण ६० व्यक्तिंना जातीचे दाखले व भूमिहिन दाखले काढून दिले.
तसेच प्रांत अधिकारी व तहसिलदार साहेब यांनी लवकरात लवकर पाठपुरावा करून ९-८-२०२४ शुक्रवार रोजी स्वतः नंदीदाले बस्ती तडसर येथे येऊन ६६ दाखले वाटप केले यावेळी तडसर ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, माझी सरपंच व पोलीस पाटील व नंदीवाले समाजातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
