उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

कडेगाव तालुक्यात १.६६ लाख सीडबॉलचे रोपण

१६,४५० विद्यार्थ्यांचा सहभाग : महसूल सप्ताहात ‘सीड बॉल’चा आदर्श

महसूल सप्ताह आणि ‘एक पेड माँ के नाम’ या केंद्र शासनाच्या संकल्पनेस पूरक असा ‘सीड बॉल’ उपक्रम कडेगाव तालुक्यात राबविण्यात आला. या उपक्रमात प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालयांतील एकूण १६,४५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत १,६६,५८२ सीड बॉल्स तयार केले. हे सर्व सीड बॉल्स २ ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी तालुक्यातील शाळा परिसर व ग्रामपातळीवरील मोकळ्या जागांवर रोपण केले. महसूल, शिक्षण आणि वनविभागातील विविध अधिकारी, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील आणि ग्रामस्थ यांनी या मोहीमेत सहभाग नोंदवला. उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, तहसीलदार अजित शेलार, नायब तहसीलदार सागर कुलकर्णी, वन परिक्षेत्र अधिकारी संतोष शिरशेटवार, गटशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर चिमटे, प्राचार्य डी. जी. कणसे, प्राचार्य डॉ. अधिकाराव जाधव, प्राचार्य डॉ. लालासाहेब जाधव उपस्थित होते.

विविध शाळा सहभागी

या उपक्रमात जिल्हा परिषदेतील ८६ प्राथमिक व ३० माध्यमिक शाळा, मातोश्री बयाबाई कदम महाविद्यालय, लोकनेते मोहनराव कदम महाविद्यालय, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज या महाविद्यालयांचे एनएसएस युनिट्स सहभागी झाले.

विकासासोबतच पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, प्रत्येकाने पर्यावरणासाठी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षणाची व संवर्धनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी अशा प्रकारचे उपक्रम फायदेशीर असल्याचे प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी सांगितले.

– रणजित भोसले, प्रांताधिकारी

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading