उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

तहसीलदारांचा एक फोन अन् खड्डा मुजला

नागरिकांतून कौतुक : रात्रीतून राज्यमार्गावर तातडीने दुरुस्ती

मंगळवारी सायंकाळी उशिरा एक फोन अन् बुधवारी पहाटे राज्यमार्गावरील खड्डा मुजवण्यात आला. कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांच्या कार्यतत्परतेचा अनुभव रामापूर आणि परिसरातील नागरिकांना आला. कडेगाव तालुक्यातून जाणाऱ्या जुना सातारा राज्यमार्गावरती रामापूरजवळ असलेल्या रस्त्याच्यामध्येच एक मोठा खड्डा पडला होता. मागील काही दिवसांपासून येथे वाहन खड्ड्यात गेल्याने लहान-सहान अपघात होत होते. मंगळवारी खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून निघालेले दाम्पत्य पडले होते.

याबाबत रामापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अधिक शिंदे यांनी तहसीलदार अजित शेलार यांना सायंकाळी फोनवरून माहिती दिली. शेलार यांनी याची गंभीर दखल घेत, सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. बांधकाम विभागानेही बुधवारी पहाटे राज्यमार्गावर पडलेल्या खड्यामध्ये मुरूम टाकून हा खड्डा मुजवला. तहसीलदारांचा एक फोन अन् रात्रीत राज्यमार्गावरील खड्डा मुजवण्यात आल्याने नागरिकांतून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading