उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

सामाजिक कार्यकर्ता अधिक शिंदेंच्या हाकेला धावले कडेगावचे तहसीलदार

रामापूर (ता. कडेगाव) येथील सामाजिक कार्यकर्ता अधिक शिंदे यांच्या हाकेला कडेगावचे कर्तव्यदक्ष तहसीलदार अजित शेलार धावल्याचे चित्र पहायला मिळाले.


रामापूर वांगी रोडवरील ओढ्याजवळ रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वारंवार अपघात होत होते या बाबी सामाजिक कार्यकर्ता अधिक शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर याबाबतची परिस्थिती अधिक शिंदे यांनी कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांच्या निदर्शनास आणून दिली शेलार यांनी या सामाजिक कार्यकर्त्याच्या हाकेला तत्परतेने धावून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी तहसीलदार अभियंता अजित शेलार अविनाश पोळ यांना तातडीने हे खड्डे मुजवण्याच्या सूचना दिल्या. तहसीलदार अजित शेलार यांच्या या सुचनेनुसार तत्परतेने सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरच्या रस्त्यामधील खड्डे मुजवून तत्पर सेवा देण्याचे काम केले.


रामापूरचे अधिक शिंदे हे सातत्याने परिसरातील सार्वजनिक सामाजिक प्रश्नावर सातत्याने लढा व आवाज उठवत असतात. त्यांच्या या हाकेला प्रशासनाचे प्रतिसाद भूमिका घेण्याचे काम तहसीलदार अजित शेलार यांनी केले आहे.

तहसीलदार अजित शेलार हे कडेगाव तालुक्यात लोकांच्या अडीअडचणी व सामान्य लोकांच्या प्रश्नावर तात्काळ कार्यवाही करण्याचे काम करत असतात. त्यामुळे या दोघांनी सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणीचा निपटारा लावण्यासाठी एकत्रित काम करुन सामान्य लोकांच्या प्रश्नाला न्याय देण्याचे काम केले आहे.

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading