उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

देवराष्ट्रे येथील दहावीच्या परीक्षा केंद्राला प्रांताधिकारी व तहसीलदार यांची अचानक भेट

देवराष्ट्र येथील यशवंतराव हायस्कूल व जुनिअर कॉलेजच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा केंद्राला कडेगाव-पलूस चे प्रांताधिकारी श रणजीत भोसले व तहसीलदार अजित शेलार यांनी अचानक भेट दिली. परीक्षा संचालनावावत त्यांनी समाधान व्यक्त केले. केंद्र संचालक के. एच. पवार यांनी परीक्षेसंबंधी सर्व माहिती दिली.

परीक्षा कें द्रावर २८४ परीक्षार्थी प्रविष्ट झालेले आहेत. एकूण १४ ब्लॉक मध्ये विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. दोन अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ब्लॉक तयार केले आहेत.

संपूर्ण ब्लॉक मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे लाईव्ह वेव कास्टिंग करण्यात येत आहे. या यंत्रणेची माहिती प्रांताधिकाऱ्यांनी घेतली. शालेय शिक्षण विभागाच्या कॉपीमुक्त परीक्षा अभियानांतर्गत देवराष्ट्रे शाळेने केलेल्या प्रयत्नांची प्रांताधिकारी व तहसीलदारांनी प्रशंसा केले.

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading