महसुल पंधरवडा निमित्त कडेगावचे प्रांतअधिकारी रणजीत भोसले व तहसीलदार अजित शेलार यांनी भटक्या विमुक्त जातीचे प्रमाणपत्र ६६ अर्जदारांच्या घरी जाऊन वितरीत केले व त्यांच्या अडवणी संमजुन घेतल्या तालुका निर्मिती नंतर प्रथमच असा उपक्रम राबविण्यात आल्याने महसूल प्रशासनाचे कौतुक होत आहे.
महसुल पंधरवडा निमित्त प्रशासन विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत त्यात भटक्या विमुक्त जातीचे प्रमाणपत्र वाटप करणे हा अभिनव उपक्रम तडसर ता. कडेगाव येथे नंदिवाले वस्ती येथे जाऊन केला गेला. भटक्या विमुक्त जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्जदारांना अनेक अड्यणीचा सामना करावा लागतो
यासाठी प्रशासनाने स्वता पुढाकार घेत एका दिवसात सर्व कागदपत्रांची पूर्तता करून जागेवरच दाखले वितरण करण्याचा अभिनव उपक्रम यशस्वी करून दाखवला आहे. यावेळी बोलताना प्रांताधिकारी रणजीत भौसले म्हणाले की महसूल विभागाची एक वेगळी नाळ सामान्य जनतेशी जोडली गेली आहे कडेगाव महसुल विभागाच्या वतीने एका दिवसात दाखले देण्याचा उपक्रम यशस्वी करून दाखवला आहे यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचला वेळेत प्रमाणात मिळाल्याने मुलांना शैक्षणिक प्रवेश व इतर योजनांचा लाभ घेणे सोईस्कर होत आहे. तहसीलदार अजित शेलार म्हणाले की १ अगस्ट ते १५ ऑगस्ट महसूल पंधरवडा म्हणून सबंध महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांद्वारे संपन्न होत असुन महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा मानला जातो. आपल्या कोणत्याही अडी अडची प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न आम्ही करू तहसील
कार्यालयात कोणत्याही कामासाठी एजंटची गरज लागत नाही तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले. यावेळी सरपंच संजना माळी, सोसायटी चेअरमन प्रविण पवार, उपसरपंच सुरज पवार, मंडल अधिकारी महादेव पाटील, शुभांगी वारे माजी सरपंच हनमंतराव पवार, ग्रामपंचायत सदस्य विराज पवार, शितल शेळके, जयंत पाटील, ग्रामविकास अधिकारी पांडुरंग पाटील आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अडचणीचा सामना करत दाखले वितरित गेले काही दिवसांपूर्वी तांत्रिक अडचणीचा सामना करत कडेगाव सेतु कार्यालयाने रात्र दिवस सेतु सुविधा देउन नागरिक, विद्यार्थी यांची गैरसोय टाळाली असल्याचे प्रांताधिकारी रणजीत भोसले यांनी सांगितले.




