उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

तब्बल १६ हजार ९३६ लाभार्थी ‘ई-केवायसी’विना

शासनाने शिधापत्रिका धारकांना ‘ई-केवायसी’ करणे बंधनकारक केले आहे. कडेगाव तालुक्यातील एकूण शिधापत्रिकेतील १ लाख १३ हजार ११९ व्यक्तींपैकी अद्याप १६ हजार ९३६ शिधापत्रिकाधारक सदस्यांची ई-केवायसी होणे बाकी आहे. ३१ जुलै २०२५ पर्यंत अखेरची मुदत असून वेळेत ‘ई-केवायसी’ न केल्यास शासनाकडून मिळणारे धान्य बंद होणार आहे. तसेच सदर सदस्यांची नावेदेखील कमी होणार आहेत. रास्त भाव दुकानदार यांच्याकडील

ई-पॉस मशीनद्वारे मोफत ‘ई-केवायसी’ करता येते. तसेच शासनाने मोबाइलद्वारे ‘ई-केवायसी’ अॅप डाउनलोड करून आवश्यक माहिती भरून अपडेट करता येते. दरम्यान, कडेगाव तालुक्यातील १६ हजार ९३६ शिधापत्रिकाधारकांची ‘ई-केवायसी’ प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. तालुक्यात १ लाख १३ हजार ११९ व्यक्ती संख्या आहे.

अद्यापही अनेक शिधापत्रिकाधारकांची ‘ई-केवायसी’ होणे बाकी आहे. अंतिम मुदतवाढ ३१ जुलै आहे. तरीही ज्यांनी ‘ई-केवायसी’ अद्याप करून घेतलेली नाही, त्यांनी तत्काळ ३१ जुलै २०२५ पर्यंत केवायसी करून घेणे आवश्यक आहे. तसेच तालुक्यातील अनेक शिधापत्रिकाधारकांनी शिधापत्रिकेला मोबाइल क्रमांक लिंक केला नाही. संबंधितांनी आपला मोबाइल क्रमांक शिधापत्रिकेशी लिंक करावा, असे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

शासनाने शिधापत्र धारकांना ई केवायसी बंधनकार केली आहे. कडेगाव तालुक्यातील अद्याप १६ हजार ९३६ शिधापत्रिका धारक सदस्यांची ई-केवायसी होणे बाकी आहे. त्यांनी ३१ जुलैपर्यंत ई-केवायसी करून घ्यावी. अन्यथा धान्य बंद झाल्यास व नावे कमी झाल्यास ते स्वतः जबाबदार राहणार आहेत. तेव्हा ज्या ज्या लोकांनी अद्याप ई-केवायसी केली नाही तसेच जे लाभार्थी बाहेर तालुक्यात राहतात त्यांनीसुद्धा तत्काळ करून घ्यावी.

– अजित शेलार, तहसीलदार कडेगाव.

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading