उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

युडीआयडी प्रमाणपत्राद्वारे दिव्यांगांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्या – जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे आवाहन

दिव्यांग बांधवांसाठी तालुकास्तरीय आरोग्य शिबीर संपन्न

दिव्यांग बांधवांनी तालुकास्तरीय आरोग्य शिबिरांचा लाभ घेऊन युडीआयडी प्रमाणपत्र मिळवावे व त्या माध्यमातून राज्य व केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभघ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले. १ सप्टेंबर रोजी कडेगाव ग्रामीण रुग्णालयात दिव्यांगांसाठी आयोजित तालुकास्तरीय आरोग्य शिबिराचा सांगता समारंभ पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, प्रांताधिकारी रणजित भोसले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्चना कोडग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग बांधवाला युडीआयडी प्रमाणपत्र स्थानिक पातळीवर मिळावे यासाठी प्रशासनाने तालुकास्तरीय शिबिरे आयोजित केली आहेत. आतापर्यंत १.१९८ दिव्यांग पात्र ठरले असून, त्यांना येत्या पंधरा दिवसांत प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. युडीआयडी प्रमाणपत्रामुळे दिव्यांगांना नोकरीत आरक्षणासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळेल. त्यांच्या जीवनात सुसह्यतेचा नवा अध्याय सुरू करण्याचा हा प्रयत्न आहे. डॉ. विक्रमसिंह कदम म्हणाले, जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दिव्यांग आरोग्य शिबिरे घेऊन युडीआयडी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया राबवली जात आहे.

दिव्यांग बांधवांनी या संधीचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष अमोल डांगे, प्रांताधिकारी रणजित भोसले, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी भारत निकम, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशा चौगुले, तहसीलदार अजित शेलार, वैद्यकीय अधिकारी वैभव पत्की आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१२९ दिव्यांग बांधवांची नोंदणीः ग्रामीण रुग्णालय कडेगाव येथे संपन्न झालेल्या यूडीआयडी शिबिरात एकूण १२९ दिव्यांग बांधवांनी नोंदणी केली. त्यापैकी ८६ लाभाध्यांची प्रमाणपत्रे योग्य असून व मंजूर झाली आहेत उर्वरित ४३ प्रकरणांमध्ये कागदपत्र अपूर्ण आहेत पुर्तता होताच संबंधिताना तात्काळ प्रमाणपत्र दिली जातील असे तहसीलदार अजित शेलार यांनी सांगितले.

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading