उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

कडेगाव तालुक्यात मंडलनिहाय महसूल समाधान शिबीराचे आयोजन

तहसीलदार अजित शेलार यांची माहिती : शासनाचा लोकाभिमुख प्रशासनाकडे ठोस पाऊल

लोकांच्या समस्या दारी जाऊन सोडवाव्यात या उद्दिष्टाने प्रेरित होऊन महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्व समाधान शिबीर या अभियानाची कडेगाव तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू होत आहे. शासनाच्या निर्णयानुसार, कडेगाव तहसील कार्यालयाच्या मार्फत तालुक्यातील पाचही मंडळांमध्ये हे शिबीर जून महिन्यात १८ जून ते २७ जून या कालावधीत नियोजित आहे. अशी माहिती कडेगावचे

तहसीलदार अजित शेलार यांनी दिली. यावेळी तहसीलदार अजित शेलार महाणले या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील सामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांना महसूल विभागाशी संबंधित सेवा घरपोच देणे. दाखले वाटप, रेशनकार्ड नोंदणी, शासकीय योजनांची माहिती, तक्रारींचे निवारण अशा अनेक सेवा एकाच छताखाली देण्यात येणार आहेत. शासन निर्णयानुसार वर्षभरात प्रत्येक मंडळात किमान चार वेळा शिबीर घेण्याचे निर्देश असून, महसूल प्रशासनाला अधिक कार्यक्षम, गतिमान व लोकाभिमुख करण्याचा सरकारचा प्रयत्न या माध्यमातून दिसून येतो.

शिबिराचे मंडलनिहाय नियोजन दिनांक व ठिकाणे : कडेगाव (२६ जून), नेवरी २७जून), वांगी (१८ जून), चिचणी (२४ जून), शाळगाव (२० जून) शिबिरांसाठी ठिकाणांवर मंडळ अधिकारी व महसूल अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading