उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

फार्मर आयडीसाठी नवीन पर्याय उपलब्ध

– अजित शेलार

ॲग्रीस्टॅक प्रणाली अंतर्गत फार्मर आयडी बनवताना येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यात आला आहे. आता सेतू संचालकांसाठी “My name is not in list” हा नवीन पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे, अशी माहिती कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांनी दिली.


अनेकदा ते म्हणाले, शेतकऱ्यांना फार्मर आयडी बनवताना त्यांचे नाव यादीत नसणे, जुनी माहिती दिसणे किंवा अलिकडील जमिनीच्या व्यवहारांमुळे नवीन सातबारा अपडेट न होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत होते. यावर उपाय म्हणून, आता सेतू संचालकांसाठी नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे, ज्या शेतकऱ्यांची नावे रजिस्ट्रेशन करताना दिसत नाहीत किंवा ज्यांची नुकतीच जमिनीची खरेदी-विक्री झाली असून नवीन सातबारा तयार झाला आहे, अशा शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी बनवणे सोपे होणार आहे. तहसीलदार शेलार यांनी सेतू संचालकांना नवीन सुविधेबद्दल माहिती देऊन, शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन पूर्ण करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading