उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

कडेगाव येथे अवयव दानासाठी क्यूआर कोडचे लोकार्पण

अवयवदान म्हणजे मृत्यूनंतरही जीवनाचा दीप जिवंत ठेवण्याची संधी ! जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या पुढाकाराने आणि दूरदृष्टीतून अवयवदानासाठी विशेष क्यूआर कोड प्रणाली विकसित करण्यात आली आहे. याचा प्रारंभ उपविभागीय अधिकारी रणजित भोसले यांच्या हस्ते

करण्यात आला. अवयवदानाची नोंदणी फक्त एका स्कॅनने करणारी ही यंत्रणा नागरिकांसाठी सोपी, सुरक्षित व पारदर्शक ठरणार आहे.

रणजित भोसले म्हणाले, एका व्यक्तीच्या अवयवदानातून आठ जणांना जीवनदान मिळू शकते. या क्यूआर कोडद्वारे कुणीही आपला आधार क्रमांक. नाव. संपर्क. वय

इत्यादी माहिती भरून अवयव दानासाठी अधिकृत नोंदणी करू शकतो. हा उपक्रम केवळ प्रशासकीय उपक्रम नाही, तर मानवतेच्या मूल्यांना चालना देणारी एक जबाबदारीची चळवळ ठरतो आहे. असा विश्वास आता सर्वत्र व्यक्त होत आहे. यावेळी प्रांताधिकारी रणजित जगताप उपस्थित होते.

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading