मुख्यमंत्री शंभर दिवस कृती आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर कडेगांव तालुक्यात कुणबी जात प्रमाणपत्रांचे तात्काळ व सुलभवितरण सुनिश्चित करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. १५) तहसील कार्यालयात केले असल्याची माहिती तहसीलदार अजित शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तहसीलदार शेलार म्हणाले की जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय अधिकारी रणजीत भोसले यांच्या सहकायनि हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
कुणबी नोंदीच्या गावनिहाय पुढीलप्रमाणे : वांगी ७३८, सोनकिरे ३६१, कोतवडे ३४५, शिरसगाव ३२२, निमसोड ३१३, शेळकबाव २४२, अमरापूर २३६, आसद २२५, चिखली २२०, शिवाजीनगर २०८, सोनसळ २०४, नेर्ली २०३, खंबाळे औंध १९४, येडे १८३, चिंचणी १७७, अपशिंगे १६९, कुंभारगाव १४७, शाळगाव १४६, विहापूर १४६, तडसर १४४, भिकवडीखुर्द १४३, हिंगणगाव बुद्रुक १२८, हणमंतवडिये ११९ पाडळी ११२, खेराडे विटा १०१, तोंडोली ८६, शिवणी ८१, उपाळेवांगी ७९, उपाळेमायणी ६८, कान्हरवाडी ६३, अंबक ६०, सोहोली ५९, हिंगणगाव खुर्द ५७, खेराडे वांगी ५५, वडियेरायबाग ५०, रायगाव ४३, येतगांव २३, मोहिते वडगाव २१, कडेगाव १९, रामापूर १९, कडेपूर १३, नेवरी १०
कुणबी नोंदी शोधताना १८६५ ते १९१० मधील मोडी लिपीतील कागदपत्रे अती जीर्ण झाली होती यातूनच तालुक्यातील विक्रमी नोंदी शोधून काढल्या आहेत. तालुक्यातील ४५ गावांतील मोडी लिपीतील असलेल्या संपूर्ण दप्तर तपासणीतून ६४३५ नोंदी सापडल्या आहेत. वांगी गावात सर्वाधिक ७३८ नोंदी सापडल्या असून, नेवरी येथे सर्वाधिक कमी म्हणजे १० नोंदी सापडल्या आहेत – अजित शेलार, तहसीलदार कडेगाव

